कृपया कॉपी करू नका

आज राजस्थान रॉयल आणि किंग इलेव्हन पंजाब यांच्यात होणार अमना सामना

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

आयपीएल २०१९ मधला चौथा सामना राजस्थान रॉयल आणि किंग इलेव्हन पंजाब यांच्यात होणार आहे जयपूरच्या सवाई मान सिंह या मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. जिथे अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल संघाच्या नेतृत्वाखाली खाली घरच्या मैदानावर विजयी सलामी आपल्या संघाला देण्याचे प्रयत्न असेल तर रवीचंद्रन अश्विन विजयी सुरुवात देण्यासाठी आपल्या संघाला घेऊन मैदानात उतरणार आहे.

Source Google

दोन्ही संघाची तुलना पाहता दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि नवदित खेळाडूंची भरणा आहे. राजस्थान रॉयल संघ पाहता या संघामध्ये अजिंक्य रहाणे कर्णधार असून त्याच्या जवळ स्टीव्ह स्मित, बटलर, बेन स्टोक, संजू सॅमसंग असे अनुभवी आणि आक्रमक फलंदाज संघामध्ये उपलब्द आहेत. तसेच जयदेव उनाडकर, धवल कुलकर्णी, के.गौतम, जोफ्रा आर्चर सारखे गोलंदाज उपलब्द आहेत.

किंग इलेव्हन पंजाब संघाकडे पाहता रावीचंद्रन अश्विन संघाचा कर्णधार असून त्याच्या कडे क्रिस गेल, के.एल.राहुल, करून नायर, मयांक अग्रवाल, असे आक्रमक फलंदाज आहेत. तरच अँड्र्यू टाय, मोहमद शमी, मुजीब उर रहमान सारखे गोलंदाज संघामध्ये उपलब्द आहेत.

Source Google

मागच्या वर्षी दोन्ही संघांचे प्रदर्शन पाहता किंग इलेव्हन पंजाबची सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु नंतर संघाचे प्रदर्शन खालावत गेले आणि सुपर चार मध्ये सुद्धा पदार्पण या संघाला करीता आले नाही. तसेच राजस्थान रॉयल संघाचे प्रदर्शन सुद्धा खराब झाले होते स्टीव्ह स्मितच्या संघाबाहेर असल्यामुळे या संघाला चांगले प्रदर्शन करता आले नाही. या संघाची पूर्ण नजर आता स्टीव्ह स्मित कडे असणार आहे कारण १ वर्ष बॉल टेम्पअरिंग मुले अंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून लांब असणारा हा खेळाडू कशी सुरुवात करतो या कडे राजस्थान रॉयल संघाचे लक्ष असणार आहे.


दोन्ही संघाकडे पाहता हा सामना रोमांचित होणार आहे. हा सामना संध्याकाळी ८ वाजता स्टार स्पोर्ट वाहिणींवर पाहायला मिळेल.

Share.

Leave A Reply