कृपया कॉपी करू नका

आजची पिढी बदलत आहे की सावरत आहे?

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

काही लोक दररोज ब्लॉग लिहतात. अगदी ठरवून विषय सूचने आणि त्यावर नवीन काहीतरी लीहणे म्हणजे स्वतःला नेहमीच कार्यरत आणि उस्फुर्त ठेवण्याची छान कल्पना आहे. सोशल मीडियावर रोज न चुकता हजर, सतर्क राहणे ही सुध्दा एक कला आहे. आजची यंग जनरेशन यात खूप अॅक्टि आहे.

खरंच आजची जनरेशन म्हणजे आपली भावी पिढी खूप हुशार आहे. खूप गोष्टी शिकण्यासारखं आहेत त्यांच्याकडून. ट्रेकिंग ची आवड असणारी ही जनरेशन अगदी आपल्या आजीला सुद्धा गडावर ट्रेकिंग करायला लावतात. त्याचबरोबर आपल्या शिवाजी महाराजांच्या गडांचा पुनर्विकास करण्याचा विचार देखील करताना दिसतात.

Source Google

अमेरिकन चोपसी आवडीने खाणारी ही पिढी घरातील पुरणपोळीचा सुद्धा तेवढ्याच आवडीने ताव मारताना दिसतात. ही भावी पिढी आपल्या एक पाऊल पुढे जाऊन मॉडर्न विचाराची तरीही त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहेत. ही जनरेशन आपल्या विचारांवर ठाम असते अत्यंत पारदर्शक आणि प्रगल्भ विचार मांडणारी आहे. कित्येकदा ही पिढी स्ट्रेट फॉरवर्ड आणि प्रॅक्टिकल राहते. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला का नाही जमत हे या अगोदरच्या पिढीच्या मनात नक्कीच येत असेल.

लेखिका स्वाती

Share.

Leave A Reply