कृपया कॉपी करू नका

आयपीएल इतिहासात पहिल्यांदा ए.ब.डिव्हिलर्स मैदानात असताना सामना पराभव झाला वाचा सविस्तर.

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

आयपीएल इतिहासात पहिल्यांदा ए.ब.डिव्हिलर्स मैदानात असताना सामना पराभव झाला वाचा सविस्तर.

आयपीएल हंगाम १२ मधला ७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर यांच्या मध्ये बँगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियम वर पार पडले. हा सामना मुंबई इंडियन्सने ६ धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्स संघाची या हंगाम मधला पहिला विजय ठरला तर रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाचा हा लगातार दुसरा पराभव झाला आहे.

या सामन्यात ए.बी.डिव्हिलर्सने ४१ चेंडूत ७० धावांची नाबाद खेळी केली परंतु त्याची नाबाद खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. आयपीएल इतिहासात असे पहिल्यांदा झाले की ए.बी.डिव्हिलर्स धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिला परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या अगोदर जेव्हा जेव्हा ए.बी.डिव्हिलर्सने धावांचा पाठलाग करताना नाबाद धावसंख्या काढली त्या प्रत्येक वेळी सामना विजय झाले होते. परंतु मुंबई विरुध्द सामन्यात नाबाद ७० धावा काढून देखील हा सामना ए.बी.डिव्हिलर्सला विजय मिळविता आले नाही. काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स ने पाहिले फलंदाजी करत १८७ धावा काढल्या होत्या परंतु रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाला १८१ धावा काढता आले. ए.बी.डिव्हिलर्स ने नाबाद ७० धावा काढून शेवटच्या ओवर मध्ये १७ धावा असताना या धावसंख्या काढता आल्या नाहीत.

या अगोदर ए.बी.डिव्हिलर्सने धावांचा पाठलाग करताना १५ वेळी नाबाद धावा आपल्या संघासाठी काढल्या होत्या आणि प्रत्येक सामन्यात विजय मिळवून दिले होते. परंतु काल पार पडलेल्या मुंबई विरुद्ध सामन्यात ए.बी.डिव्हिलर्सला सामना विजय मिळवून देता आले नाही. जर या सामन्यात अंपायरने चुकी केली नसती तर हा सामना रॉयल चॅलेंजर जिंकू शकला असता. शेवटच्या चेंडूवर ७ धावा असताना मलिंगाने टाकलेला चेंडू हा नो बॉल होते परंतु अंपायरचे लक्ष नसल्यामुळे या सामन्यात रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाला पराभव पत्करावा लागले.

Share.

Leave A Reply