कृपया कॉपी करू नका

क्विंटन डी कॉक ने शोधला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

क्विंटन डी कॉक ने शोधला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी, Source Google म्हणाला हा खेळाडू बनू शकतो भारताचा भविष्य

इंडिअन प्रीमियर लीगच्या १२ व्या हंगाम मध्ये अनेक देश-विदेशी खेळाडू आपले प्रदर्शनाने सर्व क्रिकेट रसिकांचे मन आपल्या कडे आकर्षित करीत आहेत. त्यामध्ये भारताचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंथने गेल्या दोन सामन्यात चांगले प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिषभ पंत साठी आयपीएल हि विश्वचषक मधील आपले स्थान पक्के करण्यासठी हि शेवटची संधी मानली जात आहे. काही जाणकार क्रिकेटर आणि खेळाडूच्या मताने रिषभ पंत हा खेळाडू भारतीय विश्वचषक संघामध्ये असणे गरजेचे आहे.

तर काहीच्या मते अद्यापही रिषभ पंतने आपल्या खेळीत सुधारणा करणे गरजेचे आहे. हे असताना दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेट कीपर फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्विंटन डी कॉकच्या मताने रिषभ पंत हा भारतीय विश्वचषक साठी एक मोठा खेळाडू बनू शकतो. तो म्हणाला कि रिषभ पंथ सोबत मी खेळलो आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे नेहमी आक्रमक फलंदाजी करतो आणि त्याच्यात खूप ताकत आहे. तो नेहमी आपल्या फलंदाजीत शिकण्याचे प्रयत्न करीत असतो. आणि भारतीय विश्वचषक संघासाठी रिषभ पंथ एक भारतासाठी उत्तम खेळाडू ठरू शकतो.

मुंबई इंडियन्स आणि दिली कॅपिटल सोबत झालेल्या सामन्यात रिषभ पंतने खूप सुंदर आणि आक्रमक फलंदाजी केली होती त्याने २७ चेंडूत ७८ धावा काढू मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केले होते. आणि या सामन्यामध्ये क्विंटन डी कॉक विकेट च्या मागे राहून रिषभ पंत ची फलंदाजी पाहत होता. क्विंटन डी कॉक च्या मताने रिषभ पंत हा भारतीय संघात असणे फार गरजेचे आहे. भारतीय विश्वचषक साठी हि भारताची मोठी निवेश असेल असे त्याचे म्हणणे आहे.

Share.

Leave A Reply