कृपया कॉपी करू नका

काय आहे क्रिकेट विश्वात मांकडिंग नियम आणि या नियमाची सुरुवात कशी झाली पाहू या सविस्तर

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

काय आहे क्रिकेट विश्वात मांकडिंग नियम आणि या नियमाची सुरुवात कशी झाली पाहू या सविस्तर

क्रिकेट विश्वात आता फक्त एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे मांकडिंग विवाद. आयपीएल हंगाम १२ मध्ये सोमवारी पार पडलेल्या राजस्थान रॉयल आणि किंग इलेवन पंजाब यांच्यात पार पडलेल्या सामन्यात मांकडिंग नियमामुळे झालेल्या रन आऊट विवाद मुळे क्रिकेट जगात मोठी चर्चा रंगत आहे.

या सामन्यामध्ये किंग इलेवन संघाचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयलचा खेळाडू जॉस बटलरला मांकडिंग नियमात रन आउट केले होते आणि हा रन आऊट मोठा विवाद झाला आहे. पाहायला गेले तर क्रिकेट मध्ये मांकडिंग नियम लागू आहे. परंतु हा नियम कधी अमलात आले आणि याची सुरुवाती कधी झाली हे आपण पाहू.

Source Google

मांकडिंग नियम हा भारताचा पूर्व खेळाडू विनू मांकडच्या नावाने पडला आहे. कारण अशा प्रकारचे पहिले रन आउट पहिल्यांदा करण्याचा कारनामा ह्या खेळाडूने केले होते. १९४७ वर्षी भारत आणि ऑस्ट्रीलीया यांच्यात टेस्ट सामना खेळला जात होते. त्या सामान्यदरम्यान विनू मांकड आपल्या गोलंदाजीवर नॉन स्ट्राईक फलंदाज बिल ब्राउनला नॉन स्ट्राईक रेषेच्या बाहेर जाताना पहिले आणि आपल्या गोलंदाजी एक्शनच्या अगोदर स्टंप वरील बेल उडवण्यात आले आणि यानंतर बिल ब्राउन या खेळाडूला रन आउट देण्यात आले होते.

Source Google

त्यानंतर विनू मांकड या खेळाडूवर विवाद करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हा नियम क्रिकेट विश्वात लागू करण्यात आले. याअगोदर भारताचा पूर्व विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवने अशा प्रकारचे रन आउट केले होते. कपिल देवने १९९२ या वर्षी दक्षिण आफ्रिका विरुद्ध गैरी कस्टंर्ण या फलंदाजाला मांकडिंग नियम द्वारे आउट केले होते. आर अश्विनने केलेले हे रन आउट जरी वाद-विवादात अडकला असले तरी क्रिकेट जगात हा नियम लागू आहे. आणि चेंडू टाकण्याच्या अगोदर कोणताही फलंदाज नॉन स्ट्राईक ची रेषा पार करू शकत नाही.

Share.

Leave A Reply